वॉशिंग्टन. नासाचे माजी संशोधक व हवामान तज्ज्ञ रॉय स्पेन्सर यांनी जगभरात २०१७ मध्ये मलेरिया झालेल्या लोकांच्या संख्येची तुलना कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांशी केली आहे. त्याआधारे काही निष्कर्ष मांडले आहेत. मलेरियाचा संसर्ग जास्त राहिलेल्या देशांत कोरोनाचा संसर्ग कमी असल्याचे त्यांना वाटते. मलेरियाचे प्रमाण कमी किंवा अल्प होते. अशा देशांत कोरोनाचा कहर पाहायला मिळत असल्याचा दावा स्पेन्सर यांनी केला आहे.मलेरियाचा प्रादुर्भाव झालेल्या ११ मोठ्या देशांतील कोरोनाच्या रुग्ण संख्येवरूनही स्पेन्सर यांच्या मांडणीला पुष्टी मिळू शकते. त्याशिवाय मलेरियाचा त्रास सोसणाऱ्या या देशांत कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्याही तुलनेने खूप कमी आहे. स्पेन्सर यांनी आपला दावा सिद्ध करण्यासाठी २३४ देशांतील आकड्यांचे विश्लेषण केले. मलेरियासाठी त्यांनी १ हजार लोकांवर तर कोरोनासाठी त्यांनी १० लाखांवर पीडितांची आकडेवारी स्पष्ट केली. स्पेन्सर यांच्या अभ्यासाचे दोन टप्पे अत्यंत महत्त्वाचे ठरतात.
३० देशांतील ६२०० डॉक्टरांनी कोरोना उपचारात मलेरियाचे आैषधी चांगली असल्याचे केले मान्य
मलेरियासावर हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन कोरोनावरील उपचारातही सर्वोत्कृष्ट आैषधींपैकी आहे. जगभरातील ३० देशांतील सुमारे ६२०० (३७ टक्के) डॉक्टरांनी त्याला मान्यता दिली. ६२०० डॉक्टरांची एक पाहणी करण्यात आली. त्यात ३७ टक्के तज्ज्ञांनी हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनला कोरोना विषाणूवरील प्रभावी आैषध असल्याचे मान्य केले. जागतिक आरोग्य संघटनेने मात्र अद्याप कोरोनावर काही आैषध नसल्याचे म्हटले आहे. युरोप, अमेरिका व चीनचे डॉक्टर कोरोनाच्या रुग्णांना हे आैषध देऊ शकतात. अमेरिकेत १९४० पासून या आैषधीचा उपयोग रुमेटाॅयट आर्थरायटिस व ल्यूपसच्या रुग्णांसाठी दिले जाते. सेर्मोच्या पाहणीनुसार स्पेनच्या ७२ टक्के डॉक्टरांनी प्रिस्क्राइब केले. इटलीच्या ५३ टक्के डॉक्टर म्हणाले, विषाणू नष्ट करण्यासाठी हे आैषध दिले.
जर्मनी, ऑस्ट्रेलिया टीबीच्या आैषधांनी उपचार करणार
जर्मनीत १०० वर्षे जुन्या लसीच्या अपडेट व्हर्जनच्या साह्याने कोरोनाचा नायनाट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जर्मनीतील प्लॅँक इन्स्टिट्यूट फॉर इन्फेक्शियस बायाेलॉजीचे प्रो. स्टिफन कॉफमन या लसीबाबतची चाचणी घेत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्येही वैद्यकीय तज्ज्ञ टीबीवरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या लसीचा वापर करत आहेत. या लसीद्वारे कोरोना रुग्णाला बरे करता येऊ शकेल का, याचा शोध घेतला जात आहे.
मलेरियाचा परिणाम, ११ देशांत भारताचा समावेश
मलेरियाचा सर्वाधिक कहर असलेल्या ११ देशांत कांगो, घाना, भारत, माली, मोझॅम्बिक, नायजेरिया, युगांडा, बुर्किना फासो, कॅमरून, युनायटेड रिपब्लिक, टांझानिया इत्यादींचा समावेश आहे. जगभरातील मलेरियाच्या एकूण रुग्णांपैकी ७० टक्के याच देशांतील आहेत. मलेरियामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूपैकी ७१ टक्के याच ११ देशांत होतात.