बर्लिन. जगभरातील आरोग्याधिकारी कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी एकमेकांपासून दूर राहत आहेत, तर जर्मनीत एका महापौरांनी त्या उलट वर्तन केले. बर्लिनचे उपनगर मिटेचे महापौर स्टीफन वॉन डेझल यांनी जाणीवपूर्वक आपल्या कोरोनाबाधित सहकाऱ्यासमवेत राहून स्वत:वर काेरोनाचे संकट ओढवून घेतले. आपली प्रतिकारशक्ती चांगली आहे, आपणास काही होणार नाही, असा त्यांचा दावा होता. परंतु स्टीफन यांचा दावा फोल ठरला. कारण त्यांचा कोरोना पाॅझिटिव्हचा रिपोर्ट आल्यानंतर हा विषाणू आपणास वाटतो त्याहूनही अधिक धोकादायक आहे, याची खात्री पटली. स्टीफनच्या या वर्तनावर अनेकांनी टीकेची झाेड उठवली. शहराच्या महापौराची विचारसरणी अशी असेल तर बाकीच्यांच्या बाबतीत काही बोलायलाच नको, असे टीकाकारांनी म्हटले.
मी कल्पना केली होती त्याहूनही खूप भयंकर आहे हा विषाणू
स्टीफन यांनी गेल्या आठवड्यात एका लोकल रेडिओला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, मी विषाणूची परीक्षा घेण्याची मोठी चूक केली. कारण मी कल्पना केली होती, त्याहून खूप भयंकर असा हा विषाणू आहे, असे ते म्हणाले. याचा परिणाम खूप दीर्घकाळ आपल्या शरीरात राहतो. माझी Q वाढावी, या हेतूने संसर्ग करवून घेतला. मला वाटले जास्तीत जास्ती तीन दिवस मी आजारी राहिल. नंतर प्रतिकारशक्ती चांगली होईल. मला अजिबात संसर्ग होणार नाही, असे वाटले होते. तसेच अन्य कोणापर्यंत मी संक्रमण होऊ देणार नाही, असेही वाटले. परंतु मला आलेल्या अनुभवापेक्षाही परिणाम खूप भयानक आहेत, याची कल्पना आली. त्यांच्या या मुलाखतीनंतर नागरिकांत खूप संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यांनी कोराना विषाणूच्या साथरोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केलेले नाही. तसेच अत्यंत बेजबाबदार असे वर्तन केले, अशा शब्दांत नागरिक टीका करत होते. परंतु आपण बेजबाबदार वर्तन केले नाही, असे स्टीफन यांना वाटते. माझ्या वक्तव्यांचा विपर्यास करण्यात आला, असे ते म्हणाले. मी क्वारंटाइन होतो. आहे व पुढेही राहणार आहे. माझ्या सहकाऱ्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर मी स्वत:ला १४ दिवस क्वॉरंटाइन करवून घेतले होते. कारण एका घरात कोणाचा कोरोना पॉझिटिव्हचा अहवाल आल्यानंतर इतर सदस्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची खूप दाट शक्यता असते. आमच्याकडे दुसरे घर नाही. सहकारी आजारी पडल्यानंतर हॉटेलमध्ये जाऊन राहणे मला आवडले नाही. यामुळे त्या घरातच राहिलो. मला काही कोरोनाचा संसर्ग होणार नाही, असे मला वाटले. परंतु लोकांनी याचा चुकीचा अर्थ काढला. मी बेजबाबदारपणे वागलो नाही, असे ब्राझिलियन महापौर स्टीफन वॉन डेझल यांनी सांगितले.